आपल्या राष्ट्रीय खेळाचा दुष्काळ भारतीय संघाने संपवला- छगन भुजबळ


  • ऑलिंपिक मध्ये कांस्य पदक मिळवणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाचे मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून अभिनंदन

मुंबई: दक्ष प्रतिनिधी

भारतीय हॉकी संघाने इतिहास घडवला आहे. आपला राष्ट्रीय खेल असलेल्या हॉकीमधला दुष्काळ भारतीय संघाने संपवला असल्याची भावना व्यक्त करतानाच राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पुरुष हॉकी संघाचे ऑलिंपिक मध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

कांस्य पदक विजेता भारतीय हॉकी संघ

भुजबळ म्हणाले की कांस्य पदकासाठी जर्मनीशी झालेल्या सामन्यात भारताने 5-4 असा विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारताने हॉकीमधला 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला आहे. तब्बल 41 वर्षानंतर भारताने ऑलिम्पिकमध्ये हॉकी खेळात पदक जिंकलं संपूर्ण भारतीयांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. भारतीय खेळाडू ऑलिंपिक मध्ये घेत असलेल्या मेहनतीबद्दल सुद्धा खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले पाहिजे…..

सर्वांचे कौतुक करतानाच ऑलिंपिक मधल्या सर्व भारतीय खेळाडूंना भविष्यातील सर्व सामन्यांसाठी शुभेच्छा देखील मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *